नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सॅनिटायझरची मागणी वाढलेली असताना, नफा कमवण्याच्या हेतूने, घरातच कारखाना सुरु करून, बनावट सॅनिटायझर तयार करणाऱ्या तीन व्यक्तींना पुणे पोलीसांनी अटक केली.
या कारखान्याच्या ठिकाणाहून पोलीसांनी १ लाख २ हजार ४१९ रुपये किमतीचे बनावट सॅनिटायझरही जप्त केले. अजय शंकरलाल गांधी, मोहन चौधरी, सुरेश छेडा अशी अटक केलेल्यांची नावे असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.