Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ विधानसभेत विश्वास दर्शक ठराव मांडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या भवितव्याचा निर्णय आज राज्य विधानसभेत होणार आहे.

राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. मध्यप्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात होईल त्यानंतर कमलनाथ विश्वास दर्शक ठराव मांडतील.

काँग्रेसच्या २२ आमदारानी राजीनामा दिल्यामुळे गेले १५ महिने सत्तेत असलेलं कमनाथ सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना आज सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप जारी केला असून, सरकारच्या बाजून मतदान करायला सांगितलं आहे.

भाजपानंही आपल्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केलं आहे. दरम्यान, विश्वास दर्शक ठरावासाठी रणनीती ठरवण्यासाठी  काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी सत्ताधारी पक्षाच्या आमदाकरांची बैठक झाली.

बंडखोर काँग्रेस आमदारांनी काल पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे पाठवले आणि त्यांना ते स्वीकारण्याची विनंती केली. विश्वास दर्शक ठरावावरील मतदाना दरम्यान जर काही तांत्रिक समस्या उद्धभवली तर हात उचावून बहुमताबाबत निर्णय घेण्याची विनंती भाजपाचे वरिष्ठ नेते नरोतंम मिश्रा यांनी राज्यपालाना केली आहे.

दरम्यान आजच्या विश्वास दर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर भोपाळ जिल्हा प्रशासनानं शहराच्या अनेक भागात कलम १४४ लागू केलं आहे.

Exit mobile version