नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवानची बॅडमिंटनपटू ताई त्झू यींग हिने बर्मिंगहॅम इथं झालेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं.
यींग हीनं काल झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या चेन यूफेई हिचा २१-१९, २१-१५ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तर डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सलसन यानं तैवानच्या चोऊ तिएन चेन याचा २१-१३, २१-१४ असा पराभव करून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं.