Site icon साप्ताहिक एकच ध्येय

धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी थांबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व धार्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोरोना विषाणूचे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील, असेही त्यांनी सांगितले.

तसेच कोणत्याही पक्ष आणि संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळाव्यांनाही परवानगी देऊ नका असे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीयआयुक्तांना प्रत्येकी 15 आणि 10 कोटी तर नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक 5 कोटी रुपये असे 45 कोटींचा पहिला हप्ता देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

याशिवाय देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या रुग्णांना दूरचित्रवाणी, कॅरमबोर्ड, जेवण आदी सुविधा देण्याचे आदेशही राज्यसरकारतर्फे देण्यात आले आहेत. ज्यांना व्यक्तींना घरीच देखरेखी ठेवण्यात आले आहे त्यांना डाव्या हातावर शिक्का मारला जाणार आहे. त्यामुळे या व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्या तर त्यांची ओळख पटवता येईल. तसेच या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलिसांनानिर्देश देण्यात आले आहेत.

विविधकामांसाठी नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ई-मेलच्या माध्यमातूनतक्रारी, अर्ज पाठवावेत. त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Exit mobile version