नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क देशांनी स्वेच्छेने योगदान देऊन कोविड-१९ आपत्कालीन निधी स्थापन करावा, असा प्रस्ताव प्रधानमंत्री मोदी यांनी मांडला.
यात भारताचं योगदान दहा दक्षलक्ष डॉलसचं असेल असं ते म्हणाले. कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी सार्क सदस्य देशांबरोबर प्रधानमंत्र्यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करताना ‘सज्ज रहा मात्र घाबरु नका’ हा मार्गदर्शक मंत्र असायला हवा असं सांगताना सार्क देशांनी एकत्रितपणे सज्ज राहवं आणि त्यावर मात करुन यशस्वी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
सार्क देशांमध्ये अजूनतरी दिडशेहून कमी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असले, तरी सर्वांनी सर्तक राहण गरजेचं आहे, अशी सूचना त्यांनी केली. भारत परिक्षण उपकरणासह डॉक्टर आणि तज्ञाचं जलद प्रतिसाद पथक तयार करत असल्याचं ते म्हणाले.
सभांव्य विषाणूवाहक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी भारतानं एकत्मिक देखरेख पोर्टल सुरु केल्याचं मोदी म्हणाले. सर्व सार्क सदस्य देशांच्या नेत्यांनी प्रधानमंत्र्यांच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली.