Site icon साप्ताहिक एकच ध्येय

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोविस तास चालणारी हेल्पलाईन केली सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं केलं आहे.

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, खोकला आणि ताप असेल तर इतरांशी संपर्क टाळावा. अशा स्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांकडे जाताना नाकातोंडावर मास्क बांधावा. हात धुतल्याशिवाय डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करु नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटाइझरनं हात वारंवार स्वच्छ करावेत. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरनं झाकावं. वापरानंतर लगेचच टिश्यूपेपर केराच्या बंद टोपलीत टाकावा असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारनं नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असलेला ०११ – २३९७८० ४६ हा  दूरध्वनी मदत क्रमांक सुरु केला आहे. तसंच नागरिक १०४ या क्रमांकावर आणि ncov2019@gmail.com या ई-मेल आयडीवरही संपर्क साधू शकतात. महाराष्ट्रातही नागरिक कोरोनाविषयक मदतीसाठी ०२० – २६१२७३९४ या राज्यस्तरीय तसंच मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदत क्रमांकावर संपर्क करू शकतात. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना  संदर्भात चोविस तास चालणारी हेल्पलाईन सुरू केली आहे. परराष्ट्र प्रवक्ते रवीशकुमार यांनी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली. निंयंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००११८७९७ हा आहे. इतर क्रमांक असे आहेतः ९१११२३०१२११३, ९१११२३०१४१०४ आणि ९१११२३०१७९०५. फॅक्स क्रमांक ०११२३०१८१५८. covid19@mea.gov.in या ईमेल आयडीवर मेलही पाठवू शकतात.

Exit mobile version