Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातले मॉल बंद करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातल्या मॉल बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मॉल चालकांना होणारे नुकसान भरून येण्यासाठी किमान एक-दीड वर्ष लागेल अशी भिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली आहे.

मॉल बंद असले तरी त्यासाठीचे जागेचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च मॉल चालकांना करावाच लागेल. त्यामुळे महिन्यानंतर सुमारे ९० टक्के मॉल चालकांकडे पैसेच शिल्लक राहणार नाही अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. ५ दिवस मॉल बंद राहिला किंवा ५ टक्के विक्री कमी झाल्यावर मॉल चालकाचा वर्षभराचा नफा शून्य होतो.

सध्या मॉल बंद असल्यामुळे विक्री २० ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मॉल उद्योगाला दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयाने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली. यासाठी मॉल उद्योगात भांडवल पुनर्भरण, कर्जाची पुनर्रचना, कर्जांचे पुर्नवर्गीकरण करण्याची गरज राजगोपालन यांनी व्यक्त केली.

Exit mobile version