नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोणत्याही महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाचा उपयोग पैसे मिळवण्यासाठी केला जाणार नाही, असं स्पष्टीकरण सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी आज लोकसभेत दिलं आहे.
या स्मारकांची नियमित देखभाल, संवर्धन आणि संरक्षण तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यांचा विकास आणि मुलभूत सोयी सुविधांचा पुरवठा याकडे लक्ष दिलं जाईल. असं त्यांनी सांगितलं.