Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज प्रवेशद्वारांपाशी सॅनिटायझर्स उपलब्ध केलेच पाहिजेत असा आग्रही सल्ला दिला आहे.

तापाची लक्षणं असल्यास योग्य उपचार आणि विलगीकरण करावं, थेट भेटी टाळून व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज करावं, आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा, सर्व व्यायामशाळा, मनोरंजन केंद्र आणि पाळणाघरंही बंद ठेवावीत, कार्यालयांना आंगतुकांच्या भेटीसाठी प्रवेश देऊ नये तसंच कार्यालयांच्या जागा आणि परिसर यांची वारंवार स्वच्छता करावी असा सल्लाही विभागातर्फे देण्यात आला आहे.

ज्येष्ठ वयाचे कर्मचारी, गरदोर महिला कर्मचारी तसंच काही विशिष्ट वैद्यकीय उपचार घेत असलेले कर्मचारी यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचं विभागानं म्हटलं आहे.

Exit mobile version