Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्य प्रदेश विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं मागितलं कमलनाथ सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला ताबडतोब बहुमत सिद्ध करायला सांगावं या माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारककडून उद्या उत्तर मागितलं आहे.

चौहान आणि दहा भाजपा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सकाळी साडे दहा पर्यंत उत्तर देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे. काल विधानसभा अध्यक्ष एन पी. प्रजापती यांनी राज्यपाल लालजी टंडन यांचा आदेश धूडकावून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या २६ तारखेपर्यंत सदनाची कारवाई स्थगित केली होती.

दरम्यान, मध्य प्रदेशच्या बंगळरु मधील आमदारांनी आम्ही आपणहून राजीनामे दिले आहेत असं वार्तांहरांना सांगितलं. राज्यातले प्रश्न सोडविण्यात कमलनाथ सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोप त्यांनी केला. राजीनामे दिलेले बंडखोर आमदार बंगळूरु मधल्या एका खाजगी रिसॉर्टमध्ये आहेत.

Exit mobile version