Site icon साप्ताहिक एकच ध्येय

२३ गाड्या मध्य रेल्वेने केल्या रद्द,प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्यरेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यातल्या बहुतांशगाड्या राज्यांतर्गंत चालणाऱ्या आहेत. यात डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, नंदीग्रामएक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, एलटीटी-अजनी एक्स्प्रेस, एलटीटी-निजामाबादएक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस, मुंबई-हावडादुरांतो एक्स्प्रेस, सीएसटी-निजामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस यासारख्या एकूण २३गाड्या मध्य रेल्वे रद्द केल्या आहेत. यातल्या बहुतांश गाड्या उद्यापासून रद्दकरण्यात आल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत या गाड्या चालणार नाही
व तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेनेप्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सर्वस्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता ५० रुपये मोजावे लागतील. तर पश्चिम रेल्वेच्याबांद्रा टर्मिनस, मुंबई सेंट्रल, बोरिवली यासारख्या स्टेशनवर ४० रुपये देऊनप्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागेल. दादर, अंधेरी, वसई, बोईसर, नंदूरबार याठिकाणीप्लॅटफॉर्म तिकीटासाठी ३० रुपये तर विरार, पालघर, बांद्रा, भायंदर, डहाणू,गोरेगाव, नालासोपारा, चर्चगेट आणि मालाड स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी २० रुपयेमोजावे लागतील.
Exit mobile version