Site icon साप्ताहिक एकच ध्येय

टोकियो ऑलिंपिकसाठी सराव करणा-या खेळाडूच्या क्रीडा केंद्रांव्यतिरिक्त देशातली सर्व क्रीडा शिबिरं पुढे ढकलण्यात आली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून टोकियो ऑलिंपिकसाठी सराव करणा-या खेळाडूच्या क्रीडा केंद्रांव्यतिरिक्त देशातली सर्व क्रीडा शिबिरं पुढे ढकलण्यात आली असून त्यामध्ये प्रशिक्षण घेणा-या खेळाडूंची घरी जाण्याची सोच भारतीय क्रीडा प्राधिकरण करेल. असं क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं.

ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आज ही माहिती दिली. उत्कृष्टता आणि क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय केंद्र देखील पुढची सूचना येईपर्यंत बंद राहणार असून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या काळापर्यंत प्राधिकरणानं हा निर्णय घेतल्याचं रिजीजू यांनी म्हटलं आहे. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी येत्या वीस मार्च पर्यंत वसतीगृहं सुरु राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version