Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे.

गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. गुरुवारी या आकडेवारीनं एक हजाराचा आकडा पार केला होता.

चार दिवसापूर्वी संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ११३ इतकी होती. ती आता २७ हजार ९८० झाली आहे.

Exit mobile version