कोरोना’ पार्श्वभूमीवर वेळापत्रकात बदल
मुंबई : ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने सुनावणीचे कामकाज पुढे ढकलले आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात होणाऱ्या सुनावण्या आता पुण्याऐवजी मुंबई येथील कार्यालयात दि. 30 मार्च ते 4 एप्रिल, 2020 या कालावधीत होणार आहेत. सुनावणीचे सुधारित वेळापत्रक आयोगाच्या पुणे तसेच मुंबई येथील कार्यालयात लावण्यात येईल. अत्यावश्यक कारणाशिवाय आयोगाच्या कार्यालयास भेट देऊ नये, असे आवाहनही आयोगाच्या सचिवांकडून करण्यात आले आहे.