Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तेजस या देशी बनावटीच्या ८३ लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेची मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेजस या देशी बनावटीच्या ८३  लढाऊ विमानांच्या खरेदीला संरक्षण संपादन परिषदेनं मान्यता दिली आहे. या विमानांच्या ताफ्यामुळे भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सज्जतेत मोठी वाढ होणं अपेक्षित आहे.

तेजस या  हलक्या  लढाऊ  विमानांची रचना  विमान विकास संस्थेनं केली असून हिंदुस्थान एरॉनॉटिकल्स लिमिटेडनं, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांची  निर्मिती  केली आहे.

संरक्षण संपादन परिषदेनं यापूर्वी ४० तेजस विमानांच्या खरेदीला मान्यता दिली असून आता या ८३ विमानांमुळे भारतीय हवाई दलाचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढणार आहे. तसंच त्यामुळे मेक इन इंडिया अभियानालाही चालना मिळणार आहे.

Exit mobile version