नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या विविध माध्यमांनी कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपायांसह इतर मार्गदर्शक तत्वावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केली. आरोग्य मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी, वरिष्ठ वैद्यकीय निरिक्षकांबरोबर आज डॉक्टर हर्षवर्धन यांची उच्चस्तरीय आढावा बैठक झाली.
या बैठकीत त्यांनी केंद्र, राज्य आणि विविध दूतावास यांच्या समन्वयाचाही आढावा घेतला, आणि कोविड-एकोणीसच्या प्रतिबंधात्मक उपायांवर सूचनाही केल्या