नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातच्या शिक्षण विभागानं आज खाजगी टीव्ही वाहिन्यांद्वारे शालेय विद्यार्थ्यांचे वर्गपाठ प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडत असून, त्यावर उपाय म्हणून तज्ञ शिक्षक या टीव्ही वाहिन्यांद्वारे सातवी ते नववीचे अभ्यासवर्ग घेणार आहेत.
रोज एक तास चालणा-या या वर्गपाठांचं प्रक्षेपण उद्यापासून सुरु होईल.