Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा २२,२३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच बँकेमध्ये चलनाने परीक्षा शुल्काचा भरणा करण्याची मुदत ३० मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सहकार व लेखा पदविका मंडळ तथा उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण), सहकारी संस्थाचे सचिव महेंद्र मगर यांनी एका परिपत्रकान्वये दिली आहे.तसेच

या परीक्षेची सविस्तर माहिती सहकार खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘महत्वाचे दुवे जी.डी.सी अँड ए. मंडळ’ येथे उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

Exit mobile version