Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये आज कोरोना संसर्ग झालेल्या एकाही स्थानिक रूग्णाची नोंद झाली नसल्याचं चीननं म्हटलं आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर हे पहिल्यांदाच घडलं असेल.

गेल्या तीन महिन्यापासून चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. आजही चीनमध्ये ३४ नवे रूग्ण आढळलेले असले तरीही ते परदेशातून चीनमध्ये आलेले आहेत.

चीनच्या वुहानमध्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. काल या शहरात व चीनमध्ये एकाही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं चीनच्या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

Exit mobile version