नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नॉवेल कोरोना बाधित रुग्णांची संख्या २२३ झाली असून त्यात १९१ भारतीय आणि ३२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली.
या २२३ रुग्णांपैकी २३ रुग्णांना रोगमुक्त झाल्यानं घरी पाठवण्यात आलं आहे, असं ते म्हणाले.