Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नाशिकमधला सराफा बाजार आजपासून दोन दिवस बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक शहरातला सराफा बाजार आजपासून दोन दिवस बंद असेल. याशिवाय यासोबतच केटरींग आणि फोटोग्राफर्स असोसिएशनने देखील सार्वजनिक कार्यक्रमांची कोणतीही कामं न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच नाशिकमधल्या केशकर्तन व्यवसायिकांनीही उद्यापासून दोन दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी धुळे जिल्ह्यातली सर्व किराणा दुकानं २२ मार्चला बंद असणार आहेत. नांदेडमध्येही रविवारी सर्व कापड दुकानं बंद राहणार आहेत.

Exit mobile version