नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींची चाचणी सुरू केली असून या वर्षअखेरपर्यंत त्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. रशियाच्या रोस पोत्रेब-नादझॉर या ग्राहक हक्क संघटनेनं आज ही माहिती दिली.
या संघटनेच्या संशोधन केंद्रात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसींच्या चाचण्या करण्यात येत असून या लसीचं प्राथमिक उत्पादन विविध सहा तंत्रज्ञानविषयक सहा मंचांवर आधारित आहे, असं या संघटनेनं सांगितलं.