नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं इस्त्रायलच्या शस्त्रास्त्र उद्योगाशी भांडवली संपादन करार केला असून यानुसार सुमारे ८८० कोटी रुपयांच्या तब्बल १६ हजार ४७९ हलक्या मशीनगन्स इस्त्रायलकडून खरेदी करण्यात येणार आहे.
इस्त्रायलच्या रमत हाशरोन शहरात असलेल्या या उद्योगांकडून नेगेव्ह ही हलकी मशीनगन भारतीय सैनिकांना आता मिळणार आहे. जगभरात ही मशीनगन नावाजलेली आहे.
सध्या वापरात असलेल्या शस्त्रास्त्रांच्या तुलनेत नेगेव्ह मशीनगनची मारकक्षमता आणि पल्ला मोठा आहे. यामुळे जवानांचं मनोर्धये वाढेल, असा विश्वास सैन्यदलानं व्यक्त केला आहे.