नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूसंदर्भात सुरु असलेल्या प्रत्येक संशोधनावर सरकारचं सातत्यानं लक्ष असून, संबंधितांच्या सतत संपर्कात आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत दिली.
शून्य प्रहरात सुरू असलेल्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते. कोरोना बाधेसंदर्भात कोणाची चाचणी करायची याबाबतचे निर्देश आणि वैद्यकीय सल्ला स्पष्ट आहे, असं त्यांनी सांगितलं.
तीस डिसेंबर 2019 रोजी चीनमध्ये पहिल्या कोरोना बाधेची नोंद झाल्यावर भारतानं लगेचच आठ जानेवारी 2020 रोजी आरोग्य मंत्रालयात तांत्रिक विशेषज्ञांची पहिली बैठक आयोजित केली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.