Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार घाबरू नका, मात्र काळजी निश्चित घ्या…

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून आवाहन                                  

पुणे : कोरोना प्रतिबंधाबाबत प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपायोजना समाधानकारक असून कोरोना प्रतिबंधासाठी केंद्रीय पातळीवरून आवश्यक असलेल्या उपायोजनांसाठी तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच घाबरू नका, मात्र काळजी निश्चित घ्या, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. जावडेकर यांनी आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधला. कोरोना संदर्भात नागरिकांनी आवश्यक ती घ्यावयाची खबरदारी व त्यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली करावयाची कार्यवाही आणि उपाययोजनांबाबतचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवडमहानगरपालिकेचे आयुक्त्‍  श्रावण हर्डीकर यांनी कोरोनाबाबत सविस्तर माहिती दिली.

केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, पुणे जिल्हयात कोरोना प्रतिबंधासाठी  आरोग्य व्यवस्था, औषधांची पुरवठा तसेच जनजागृतीचे कार्य निश्चितच समाधानकारक आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने कोरोना संदर्भात आवश्यक ती जनजागृती केली जाईल. कोरोना उपाययोजना करताना केंद्र सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य नागरिकांमधील काही व्यक्तींना कोरोनाबाबत आवश्क प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. जेणेकरून या व्यक्ती त्या क्षेत्रातील इतर नागरिकांना माहिती देऊ शकतात. सोशल डिस्टन्सबाबत जागृती करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version