नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर केंद्र सरकारचं बारीक लक्ष असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरचे दर सरकारनं आखून दिल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दोन तसंच तीन स्तरांच्या मास्कचे दर आठ ते दहा रुपये तर 200 मिलिलीटर सॅनिटायझरची बाटली 100 रुपयांना असल्याचं त्यांनी सांगितलं. 30 जूनपर्यंत हेच दर कायम राहतील, अशी माहिती पासवान यांनी दिली आहे.