Site icon साप्ताहिक एकच ध्येय

युएईत कोविड१९ मुळे दोन रुग्ण दगावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले दोन रुग्ण दगावले. यात एका ५८ वर्षीय भारतीय नागरिकाचाही समावेश आहे.

त्याला हृदय तसंच मूत्रपिंडाचाही आजार होता अशी माहिती युएईच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर दुसरा रुग्ण युएईचाच नागरिक असून, तो युरोपातून परतला होता.

सध्या युएईत १२ भारतीय नागरिकांसह १४० जणांना कोविड १९ या आजाराची लागण झाली असून, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३१ जण या आजारातून बरे झाले आहेत.

Exit mobile version