Site icon साप्ताहिक एकच ध्येय

तुर्कस्थानात कोविड१९ मुळे पाच रुग्ण दगावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले पाच रुग्ण दगावले. यामुळे तिथे या आजारानं दगावलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.

कालच्या दिवसभरात तिथे कोरोनाची बाधा झालेले आणखी ३११ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तुर्कस्तानमधल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७० इतकी झाली आहे.

कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये, आरोग्यविषयक स्वच्छतांच्या नियमांचं पालन करावं, तसंच सामाजिक पातळीवर परस्परांपासून सुरक्षित अंतर राखावं असं आवाहन तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी नागरिकांना केलं आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून तुर्कस्तानमधल्या शाळा, विद्यापीठं आणि मशीदी बंद केल्या असून, जमावानं एकत्र येण्यावरही निर्बंध घातले आहेत.

Exit mobile version