Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अत्यावश्यक सेवेसाठी एसटीची मदत

मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मुंबईतील लोकलसह सर्व प्रकारची रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट व टाकली आहे.

त्यानुसार मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत (तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होईल.)

केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने – आण करण्यासाठी एसटीच्या  बसेस  दर 5 मिनिटांला याप्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. या बसेस….

  1.      पनवेल-वाशी,
  2. पनवेल-दादर,
  3. पालघर-बोरिवली,
  4. विरार- बोरिवली,
  5. वाशी-दादर,
  6. आसनगाव- ठाणे,
  7. कल्याण- ठाणे,
  8. कल्याण -दादर,
  9. बदलापूर –ठाणे
  10. नालासोपारा- बोरिवली या मार्गावर धावतील.

याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील सर्व एसटी बसेस राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद होणार आहेत.

Exit mobile version