Site icon साप्ताहिक एकच ध्येय

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. महापालिका मुख्य भवनातील लोकशाही दिनास उपस्थित राहण्याकरिता नागरिकांनी प्रथम नागरी सुविधा केंद्र विभागाकडे आवश्यक कागद पत्रांसह दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे 15 दिवसांपूर्वी अर्जदाराकडून प्राप्त झालेले अर्ज दोन प्रतीत असणे आवश्यक आहे.

अर्ज विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जासंदर्भांत संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनामध्ये नागरी सुविधा केंद्र विभागाकडून टोकन प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल. विहित नमुन्यातील निवेदने / अर्ज नसल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

१)  न्यायप्रविष्ठ बाबी,

२)  राजस्व / अपील,

३)  सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी,

४)  विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागद पत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज

स्वीकारले जाणार नाही,

५)  अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज,

वरील प्रमाणे अर्ज लोकशाही दिनांकरीता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत व अशा अर्जावर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही, परंतु असे अर्ज नियमानुसार पुढील ८ दिवसात संबंधित खात्याकडे पुढील कार्यवाही करिता पाठविण्यात येतील. तरी कृपया संबंधित नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे.

 

Exit mobile version