Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सुमारे चार कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी मास्कची मोठ्या प्रमाणात गरज असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज मोठी कारवाई करत अंधेरीतल्या सहार भागातून २५ लाखांहून अधिक मास्क जप्त केले. सुमारे चार कोटी रुपयांचे हे मास्क आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मास्कची साठवणूक आणि काळा बाजार करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी मंत्री आणि भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

Exit mobile version