Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातले १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णायात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले असल्याची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधीकारी दक्षा  शाह यांनी आज दिली.

गेले काही दिवस हे रुग्ण उपचार घेत होते. त्यांचे रक्ताचे नवीन नमुने चाचणीसाठी पाठवले असता ही चाचणी निगेटिव्ह असल्याचं आढळलं. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. लवकरच या रुग्णांना घरी पाठवलं जाईल, असंही शाह यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील पहिलं  करोनाग्रस्त दांपत्य डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेऊन करोनामुक्त झाले आहे. १४ दिवसांनी केलेली त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह असून त्यांची आज पुन्हा चाचणी केली जाईल, ती निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी पाठवून  त्यांचं १४ दिवस घरी विलगीकरण करण्यात येणार आहे.

Exit mobile version