नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं यापूर्वी कांजण्या आणि पोलिओसारख्या आजारांचं उच्चाटन केलं असून घातक कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता भारताकडे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
जगभरात कोवीड – १९ या आजाराचा प्रकोप वेगानं वाढत आहे , मात्र हा प्रकोप रोखणं अजूनही शक्य आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हंटलं आहे.
जगभरात कोवीड – १९ या आजारामुळे आतापर्यंत १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३ लाख ४१ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूचं संक्रमण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटनेनं हा इशारा दिला आहे.