Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्यप्रदेश विधानसभेत शिवराजसिंह चौहान यांनी सिद्ध केलं बहुमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.

कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी काल चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आज त्यांनी बहुमत सिद्ध केलं.

भाजपाच्या १०७ सदस्यांसह अपक्ष दोन, बसपाच्या दोन आणि समाजवादी पक्षाच्या एका सदस्यानं विश्वासदर्शक प्रस्तावाच्या बाजूंनं मतदान केलं. यावेळी काँग्रेस सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते.

Exit mobile version