Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करूनही पळून गेलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरातच विलगीकरण केलेलं असताना पळून गेलेल्या महिलेविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही महिला शारजाह हून १५ मार्च रोजी नागपूर विमानतळावर आली होती. तिला घरातच विलगीकरण करून राहण्यात सांगितलं होतं.

मात्र सोमवारी पोलिसांनी पाहणी केली असता ती घरी आढळून आली नाही. ती उत्तर प्रदेशात तिच्या नातेवाईकांकडे केल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

Exit mobile version