Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोरोना बोधितांची संख्या १०७

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईत ३ आणि अहमदनगरमध्ये १ नवा रुग्ण आढळला आहे.
अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. एकूण २१८ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक व्यक्ती बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्यानं एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती.
सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका ६३ वर्षीय पुरुषाला ही कोरोनाची लागण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्ये चार कोरोना बाधीत रुग्ण राहत असलेल्या परिसरात पूर्णतः नाकाबंदी करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर स्वच्छ, निर्जंतुकीकरण  करण्यात आलं आहे. आरोग्य विभागा च्या स्वतंत्र पथकाने आजूबाजूच्या लोकांची तपासणी सुरु केली आहे.
Exit mobile version