Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रुग्णांवर उपचार करायला नकार दिला तर परवाना रद्द करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना संकटाला शासकीय आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी सामोरी जात असताना, खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालयं सरकारला मदत करीत आहेत, पण काही डॉक्टर्स आणि खाजगी रुग्णालयं त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने ही मोठी आणीबाणीची वेळ असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रूग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळल्यास शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी असं त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version