Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ७१ वर्षीय चार्ल्स यांना सौम्य स्वरूपातली लागण झाली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांच्या कार्यालयानं सांगितलं आहे.

त्यांची ७२ वर्षीय पत्नी कॅमीला यांना मात्र कोरोनाची लागण झाली नसल्याचं या कार्यालयं स्पष्ट केलं आहे. मात्र , खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनाही स्वतंत्र कक्षात ठेवलं आहे.

Exit mobile version