नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशातल्या ५०० हून अधिक मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना आणि साखर कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात इथेनॉल मिळावं यासाठी येणारे दूर करण्याचं आवाहनही केंद्रानं राज्य सरकार आणि विविध विभागांना केलं आहे.
यासाठी आवश्यक परवानग्याही लवकरात लवकरच देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. सध्या उत्पादन करत असलेल्या कंपन्यांनाही तीन शिफ्ट मध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ग्राहक संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
या बरोबरच २०० मिलीलिटरच्या सॅनिटायझरची किरकोळ विक्री किंमत 100 रूपये निश्चित करण्यात आली आहे असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.