नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरगरीब आणि असंघटीत कामगारांसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या मदतीची योग्य अंमलबजावणी घेणं आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
ते सामाजिक संपर्क माध्यमावरून बोलत होते. या लॉकडाऊनच्या काळात, आर्थिक ताण पडला तर थोडा सहन करावा आणि प्रत्येकाने आपल्यापेक्षा वंचिताला मदतीचा हात द्यावा, असं आवाहन पवार यांनी केलं. कोरोना प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी पूर्णवेळ घरात थांबणं आवश्यक असल्याचं पवार यांनी नमूद केलं. अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरून विचारलेल्या प्रश्नांनाही पवार यांनी उत्तरं दिली.