नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी भांडवली बाजारात आज तेजी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात जागतिक बाजारात मंदी होती त्या अनुषंगानं आज आशियायी बाजारात उत्साही वातावरण दिसलं. अमेरिकी डॉलरनं घसरण नोंदवली.
संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. चीन आणि इटली पेक्षा अमेरिकेत सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये ३० लाखांपेक्षा जास्त तरुण या महामारी मुळे बेरोजगार झाले आहेत. एस अँड पी-५०० या कंपनीला गेल्या तीन दिवसात ऐतिहासिक फायदा झाला. मात्र सिडनी, तैपेई, जकार्ता, मनिला या भांडवली बाजारात ऐतिहासिक घसरण झाली.
बाजार सावरण्यासाठी अमेरिकेन २ लाख कोटी डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. प्रतिनिधी सभेच्या मंजुरी नंतर हा निधी दिला जाईल.