नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आज पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी हा राष्ट्रीय निधी वापरता येईल. प्रधानमंत्री स्वतः अध्यक्ष असून संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत. यात दिलेली देणगी कर सवलतीला पात्र असून पी एम इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊन पीएम-केअर्स निधीत योगदान देता येईल.
पीएम-केअर्सचा खाते क्र 2121PM20202 असून SBIN0000691 याचा आय एफ एस सी कोड आहे, तर SBININBB104 हा स्विफ्ट कोड आहे. pmcares@sbi हा यु पी आय, आय डी आहे .
भारतीय प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांच्या संघटनेनं या निधीला २१ कोटी रुपये आणि प्रत्येकी एक दिवसाचं वेतन असं योगदान दिलं आहे. अभिनेता अक्षयकुमारने २५ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे.
भाजपाच्या सर्व खासदारांनी आपल्या निधीतून प्रत्येकी१ कोटी रुपये कोरोना प्रसार रोखण्याच्या कामासाठी द्यावेत असं पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितलं आहे.