नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत लवकरच कोविड-१९ या आजारावर औषध विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सुरु केलेल्या चाचण्यांमध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या, साथीचे आजार विभागाचे प्रमुख डॉक्टर रमण आर. गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली.
सद्यस्थितीत विविध संशोधकांचे सुमारे तीस गट कोरोना विषाणूविरोधात उपचार विकसित करण्यासाठी संशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी असल्याने भारत या संशोधनात सहभागी झाला नव्हता, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच व्यक्तिगत पातळीवर तपासणी करता येतील अशी उपकरणे विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.