नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज आढळून आले. या मुलाच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिलिपाईन्समधून वाशीच्या मशिदीत आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे. एकाच कुटुंबातल्या चार व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. अजून ८ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. तर १२ जणांचे अहवान नकारात्मक आले आहेत.