नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर येथे विशिष्ट अंतर ठेवत रक्तदान शिबीर घेण्यात आले. ११० पिशव्या रक्त संकलित करण्यात आले.
वाशिम जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात गेलेले ऊस तोडणी कामगार संचारबंदीच्या काळात एका लहान टेम्पो मधून परतले. तसंच हैदराबादहून राजस्थानमध्ये जाणाऱ्या एका बंद कंटेनरमध्ये ८० ते ९० कामगारांना नेताना पोलिसांनी पकडले. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दरम्यान काल पोलीस प्रशासनान एका ढाब्यावर अवैध रित्या विक्री होत असलेली ४ लाख ५७ हजार रुपये किंमतीची दारू पकडली.