Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना विरोधातल्या लढ्याकरता खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कल्याण लोकसभा खासदार डॉ. शिंदे यांनी लोकप्रतिनीधी या नात्याने कोरोना विरोधातल्या लढ्याकरता आपल्या खासदार निधीतून ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे हा निधी सुपुर्द केल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

आपण सर्वांनी एकजुटीने राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कोरोना विरोधातल्या लढ्यात आपापल्या परीने भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी सर्व पक्षीय लोकप्रतिनीधी आणि नागरिकांना केले.

Exit mobile version