Site icon साप्ताहिक एकच ध्येय

थेट प्रवेशासाठी भारतीय स्पर्धा आयोगाने नमूना एक (फॉर्म I ) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये केल्या सुधारणा

नवी दिल्‍ली : सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धा आयोगाने थेट प्रवेशासाठीचे बदल अंतर्भूत करण्याच्या उद्देशाने नमूना एक (फॉर्म I) मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

स्पर्धा कायदा 2002 (अधिनियम)च्या कलम 6(2) आणि संयोजन नियमावलीचे नियमन 5(2) अन्वये नोटीस दाखल करण्यासाठी हा थेट प्रवेशासाठीचा सुधारित नमूना  वापरला जाईल.

या नमून्या सोबत  जोडावयाची कागदपत्रे आणि माहिती या मार्गदर्शक सूचनांमधून मिळते. थेट प्रवेशासाठीचे पात्रता निकषांविषयीचे स्पष्टीकरणही याद्वारे मिळते. संबंधित व्यक्तींना फॉर्म भरणे सुलभ व्हावे यादृष्टीने, सीसीआय या मार्गदर्शक सूचना त्यांना उपलब्ध करून देते.

विलीनीकरण आणि अधिग्रहण प्रक्रिया सुरळीत ठेवून ती अधिक जलद आणि सोपी करण्याच्या नियमित प्रक्रियेचा सातत्याने सुरु असलेला प्रयत्न म्हणून ऑगस्ट 2019 मध्ये सीसीआयने थेट प्रवेशासाठी संयोजन करायला मान्यता आणि स्पर्धा कायदा 2002 (अधिनियम) च्या कलम 6 (2) आणि संयोजन नियमावलीचे नियमन 5 (2) अन्वये नोटीस दाखल करण्यासाठी सुधारित (नमूना एक) फॉर्म I विषयी स्वयंचलित प्रणाली सुरु केली.

नमूना दाखल करण्यापूर्वी संबंधित व्यक्तींनी नमूना एक

(फॉर्म I) विषयीच्या अधिक माहितीसाठी मार्गदर्शन हवे असल्यास सीसीआयच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. संबंधित व्यक्तींनी या विषयीच्या अधिक माहितीसाठी सीसीआयच्या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचनांचा लाभ घ्यावा.

नमूना एक (फॉर्म I )मधील सुधारित सूचना https://www.cci.gov.in/sites/default/files/page_document/Form1.pdf  यावर उपलब्ध आहेत.

Exit mobile version