Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वंचित बहुजन आघाडीने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दिल्ली : वंचित बहुजन आघाडीतर्फे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान आणि मोजलेल्या मतदानामध्ये आढळून आलेल्या मोठ्या तफावती निवडणूक आयोगासमोर मांडल्या.

देशामध्ये निष्पक्ष आणि मुक्त निवडणूका घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे. निवडणूक आयोग ही, स्वायत्त संस्था आहे आणि देशातील नागरिकांमध्ये ईव्हीएम विषयी शंका आणि आक्षेप असतील, तर त्याचे निराकरण करणे आयोगाचे काम आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशीनऐवजी बैलेट पेपरवर घ्याव्यात, ही प्रमुख मागणी निवडणूक आयोगाकडे केली.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील पहिला राजकीय पक्ष आहे. ज्याने निवडणूक आयोगासमोर ही भूमिका मांडलीय. सर्वच राजकीय पक्षांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे. असे मत अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. अब्दुल रेहमान अंजारीया, अँड. सागर उपस्थित होते.

Exit mobile version