Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमरावती, नागपुर आणि वाशिममध्ये अवकाळी पावसाची हजेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात आज गारपीटीसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या गारा पडल्या. नागपुरातही आज  अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

वाशिम शहरात आज मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास जवळपास अर्धातास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मार्च महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात तिसऱ्यांदा अवकाळी  पाऊस झाला आहे.

राज्यात येत्या ४८ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात विदर्भ, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
Exit mobile version