Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी केला ४५ कोटी निधी मंजूर

मुंबई  : कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी तसेच लॉकडाऊनमुळे विस्थापित झालेले आणि परराज्यातील अडकलेल्या कामगारांच्या व्यवस्थेसाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदेशानुसार 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

विस्थापित कामगार यांच्यासाठी निवारा गृह, अन्नधान्य व भोजन तसेच इतर तातडीने करावयाच्या उपाययोजनांसाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन राज्य कार्यकारी समितीची बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

विभागीय आयुक्त कोकण- रु. 15 कोटी, नागपूर- रु.5 कोटी, पुणे- रु.10 कोटी, अमरावती- रु. 5 कोटी, औरंगाबाद- रु. 5 कोटी, नाशिक- रु. 5कोटी, असा राज्यातील सर्व जिल्ह्यांना एकूण रु.45 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला.

Exit mobile version